Take a fresh look at your lifestyle.

एकेकाळी भारतीयांची फेव्हरेट असलेली ‘ती’ गाडी दमदार लुकसह झाली पुन्हा लॉंच; वाचा जबरदस्त फीचर्स

मुंबई : 

Advertisement

एकेकाळी प्रत्येक भारतीय या गाडीच्या प्रेमात होता. टाटा सफारी या गाडीची राजकीय पुढार्‍यांनाही भलतीच क्रेझ होती. आता ही टाटा सफारी नव्या दमदार लुकसह जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे. 

Advertisement

टाटा मोटर्सने परवा सफारीचे नवीन मॉडेल लॉंच केले. कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये या गाडीचे उत्पादन केले आहे. ऑटो एक्सपो 2020 मध्ये टाटा सफारीला ग्रॅविटास कोड नावाने शोकेस केले होते. टाटा हॅरियरची ही 7 सीटर आवृत्ती आहे. नवीन 2021 टाटा सफारीचे बुकिंग 4 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

Advertisement

सफारी टाटा मोटर्सच्या इम्पॅक्ट  2.0 डिजाइन लैंग्वेजवर आधारित आहे आणि टाटा सफारीवर “ओमेगार्क” प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल. नवीन टाटा सफारीत 6 किंवा 7 लोक बसू शकतात. 2021 टाटा सफारी एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सटी, एक्सझेड आणि एक्सझेड ट्रिममध्ये उपलब्ध असेल. या गाडीची चाचणी भारतातील सर्व हवामानासाठी घेण्यात आली आहे. तापमान -10 डिग्री ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात चाचणी घेण्यात आली आहे. प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावर ती आरामात चालण्यास सक्षम आहे. टाटा सफारीमध्ये १ इंच मशिन्ड अ‍ॅलोय व्हील्स असतील.

Advertisement

असे आहेत फीचर्स :-

Advertisement
  • स्टेप्ड पैनोरैमिक सनरूफ
  • Xenon HID प्रॉजेक्टर हैडलैंप्स
  • क्रोम स्टडेड ट्राई एरो फ्रंट ग्रिल
  • ट्विन लाइट एलईडी टेल लैंप्स
  • केबिनमध्ये एशवुड डैशबोर्ड, ओइस्टर व्हाइट थीम इंटीरियर, ओइस्टर व्हाइट लेदर अपहोल्स्ट्री, 8.8 इंच फ्लोटिंग आयलैंड इन्फोटेनमेंट सिस्टम, प्रीमियम 320 वॉट जेबीएल ऑडियो सिस्टम, मूड लाइटिंग, 6 वे पावर्ड ड्राइवर सीट

असे आहेत इंजिन फीचर्स :-

Advertisement

2021 टाटा सफारीमध्ये 2.0 लिटर, 4 सिलिंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असेल. हे 170 एचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क तयार करते. यात 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमेटिक ट्रांसमिशन देखील आहे. एसयूव्हीमध्ये इको, सिटी, स्पोर्ट्स असे तीन राइडिंग मोड आहेत. याशिवाय ईएसपी टेरिन रिस्पॉन्स मोड – नॉर्मल, रफ आणि वेट देखील दिले आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply