Take a fresh look at your lifestyle.

जिओने मारली तिथेही बाजी: ‘त्या’ बाबतीत मागे टाकले अॅपल, अॅमेझॉन आणि अलिबाबाला, वाचा काय आहे जिओचा नवा धमाका

मुंबई : 

Advertisement

जिओ नेहमीच काही न काही धमाका करत असते. यावेळीही जिओने एक बडा धमाका केला आहे. ज्यामुळे मार्केटमध्ये जिओची चलती असल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीयलची टेलिकॉम आर्म रिलायन्स जिओ अद्याप 5 वर्षाचीही झालेली नाही. आपल्या कमी कार्यकाळातही जिओ कायम इतर कंपन्यांच्या तुलनेत पुढेच राहिलेली आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जिओ हा जगातील 5 वा सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे.

Advertisement

‘ब्रँड फायनान्स ग्लोबल 500’ यांच्या २०२१ वर्षाच्या अहवालात हे नोंदवले गेले आहे. जिओची BSI स्‍कोर 100 पैकी 91.7 आहे आणि जिओला एलिट AAA+ ब्रँड रेटिंग मिळाले आहे. या यादीतील अनेक प्रसिद्ध कंपन्यांपेक्षा जिओ पुढे आहे. या यादीमध्ये चिनी मोबाईल अॅप WeChat  ला प्रथम स्थान देण्यात आले आहे.

Advertisement

सप्टेंबर 2016 मध्ये तयार झालेली जिओ ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी दूरसंचार कंपनी आहे. जगातील 5 वा सर्वात मजबूत ब्रँड होण्यासाठी जिओला 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला आहे. जिओकडे सध्या 40 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांचा बेस आहे. जिओ देशांतर्गत स्तरावरचा सर्वात मोठा मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आहे, तर जगातील तिसरा सर्वात मोठा मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply