Take a fresh look at your lifestyle.

धुमधडाका नाही, तर धडाम..धडाम..; म्हणून पाच दिवसात ३ हजार अंकांनी घसरण

मुंबई :

Advertisement

मोठ्या धुमधडाक्यात ५० हजारांची पातळी पार केलेल्या मुंबई शेअर बाजाराने मागील पाच दिवसात मोठी आपटी खाल्ली आहे. त्यामुळे फ़क़्त पाच दिवसात सेंसेक्स तब्बल ३ हजार अनाकांनी कोसळला आहे. त्यामुळे अनेकांच्या लाखाचे बारा हजार झालेले आहेत.

Advertisement

गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स तीन हजाराहून अधिक अंकांनी खाली आला आहे. २१ जानेवारी रोजी निर्देशांक ५०,१८४ वर होता. आज, आठवड्याच्या तिसर्‍या व्यापाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शेअर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. गेल्या पाच दिवसांपासून हा घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ५३५ अंक म्हणजेच १.१३ टक्क्यांनी घसरून ४६,८७४ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १४९ अंक (१.०७ टक्के) घसरून १३,८१७ वर बंद झाला.

Advertisement

जागतिक बाजारपेठेतही सध्या घसरण पाहायला मिळत आहे. तसेच अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याचाही बाजारावर मोठा दबाव आहे. परिणामी ही मोठी घसरण होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply