मुंबई :
कोरोनाच्या संकटापाठोपाठ बर्ड फ्लूचे संकट भारतात पसरले आहे. मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची कत्तल झाली आहे. कावळा आणि इतर पशूंचाही बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचं सावट आहे. बर्ड फ्लूचं संकट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणं टाळावं असं प्रशासनाने बजावलं आहे. अशातच शिखर धवनने काही पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो व्हायरल झाले आहेत.
वाराणसीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे शिखर धवन अडचणीत सापडला आहे. शिखर धवनला पशूंच्या संपर्कात आल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
गंगा नदीमध्ये पक्षांना खायला टाकल्याने बर्ड फ्लू नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत स्थानिक वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी धवनवर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आता ६ फेब्रुवारी रोजी यावर कोर्टात सुनावणी होईल. यादिवशी हे प्रकरण योग्य की अयोग्य यासंदर्भात कोर्ट निर्णय घेणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यावर देखील २७ जानेवारी रोजी ऑनलाइन गेमचा प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं :-
धवन वाराणसीतील प्रसिद्ध बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी तसेच गंगा आरतीमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर वारासणीतील गंगा नदीमध्ये होडीने फिरण्याचा आनंद लुटताना धवनने जवळपासच्या पक्ष्यांना दाणे खाऊ घातले होते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!