Take a fresh look at your lifestyle.

म्हणून थेट राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच टाकला बहिष्कार; पहा कोणते पक्ष आहेत सहभागी

दिल्ली :

Advertisement

द्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. भारतीय संसदीय पद्धतीप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात केली जाते. मात्र, त्याच अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा तब्बल १६ राजकीय पक्षांनी केली आहे.

Advertisement

अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 16 राजकीय पक्षांनी प्रसिद्धीत्रक जारी केले आहे. 9 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनात कृषी सुधारणा कायदे हाच केंद्रबिंदू राहणार आहेत.

Advertisement

त्यामुळेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांना विश्वासात न घेता सरकारने कृषी सुधारणा कायदे मंजूर केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस, अेआययूडीएफ या राजकीय पक्षांचा बहिष्कार टाकण्याच्या निवेदनामध्ये सहभाग आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply