फेसबुकबाबत मार्क झुकरबर्गने घेतला सर्वात मोठा निर्णय; ‘त्या’ क्षेत्राला बसणार मोठा फटका

मुंबई :
सध्या मार्क झुकरबर्ग व्हाट्सअप पॉलीसींमुळे गोत्यात आला असताना मार्क यांच्या दुसर्या कंपनीने म्हणजेच फेसबुकने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर राजकीय एकांगीपणा दाखवण्याचे आरोप लागले होते. त्यानंतर प्रमुख म्हणून मार्क झूकरबर्गने त्याचे स्पष्टीकरणही दिले होते.
आता फेसबुकचा राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे, अशी टीका होत असताना फेसबुकने मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्स केले जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.
मार्क यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतसा आहे. तो ऐकल्यानंतर असं दिसून आलं की, लोक आता राजकीय बातम्या पाहणं पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा बदलण्याचा विचार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला 11.22 अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर 3.88 डॉलर्सची कमाई केली.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक