फेब्रुवारी महिन्यात बँकांना आहेत ‘इतके’ दिवस सुट्ट्या; वाचा, सुट्ट्यांची तारीख नाहीतर होईल घोळ
मुंबई :
बर्याचदा असे होते की आपल्याला एखादा आर्थिक व्यवहार करायचा असतो मात्र तेव्हा बँक बंद असते. अनेकदा असेही होते आपण आपल्या सुट्टीदिवशी एखादा व्यवहार करण्याचे ठरवतो. मात्र त्याच दिवशी नेमकी बँकेलाही सुट्टी येते. यावेळी फेब्रुवारी महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत.
शनिवारी आणि रविवार वगळता देशातील विविध क्षेत्रांमध्ये 7 दिवस बँकांना सुट्टया आहे. अर्थात फेब्रुवारीत सात दिवस बँका बंद राहतील. वेगवेगळ्या राज्यांच्या सणाप्रमाणे सुट्टया आहेत. फेब्रुवारी महिन्यात बँकेत जादाच्या सुट्या नाहीत. जाणून घ्या बँक हॉलिडे कधी आहेत. 12 फेब्रुवारीला सिक्कीमच्या बँकांना सुट्टी आहे, या दिवशी सोनम लोसारच्या निमित्ताने बँका बंद ठेवल्या जातील. 13 फेब्रुवारी हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे, म्हणून त्या दिवशी बँका बंद राहतील.
मणीपूरमध्ये लुई नगाई नीच्या निमित्ताने 15 फेब्रुवारी रोजी बँका बंद राहतील. वसंत पंचमी १६ फेब्रुवारीला आहे, त्या दिवशी पंजाब, हरियाणा, ओरिसा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील बँका या दिवशी बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. मिझोरम आणि अरुणाचलच्या बँका २० फेब्रुवारीला बंद राहतील. 26 फेब्रुवारी रोजी हजरत अली जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशमध्ये सुट्टी असेल. त्याच वेळी, गुरु रविदास जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी, चंडीगड, हिमाचल प्रदेश येथे बँक बंद असतील.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट