Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून देश शांत, नाहीतर पेटून उठला असता..’; पहा राहुल गांधींनी नेमके काय म्हटलेय

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी सुधारणा कायद्यावरून सुरू असलेले आंदोलन आता काहीसे शांत झालेले आहे. अशावेळी पुन्हा एकदा हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने मागे घेण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

Advertisement

केरळ राज्यातील वायनाड येथे सध्या राहुल गांधी दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी मोदी सरकारच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही. अन्यथा सगळा देश पेटून उठेल.

Advertisement

देशभरातील बहुतेक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी कायदे, या कायद्यातील तरतुदी, कायद्यातील नियम यांविषयीची माहिती नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याची नीट माहिती झाली, तर देशात मोठे आंदोलन होईल. सगळा देश पेटून उठेल, असा दावा करताना त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला आहे.

Advertisement

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी करतानाच त्यांनी देशातील सद्य परिस्थिती तुम्ही सर्वजण जाणून आहात. केवळ दोन ते तीन बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रत्येक उद्योगावर तीन ते चार उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply