Take a fresh look at your lifestyle.

ना हिरेजडित, ना सोन्याचा लवलेश तरीही जगातील सर्वात महागडे बूट विकले गेलेत तीन कोटीला; वाचा त्यामागची रंजक गोष्ट

काही दिवसांपूर्वी महागड्या गोष्टींचा एक नवीन विक्रम नोंदविला गेला. सर्वात महागडे स्नीकर शूज विकण्याचा हा विक्रम होता. नाईकी कंपनीने आयोजित केलेल्या ‘Moon Shoe’ या ऑनलाईन लिलावात एक बूटजोडी 4,37,500  डॉलर्सला विकली गेली. भारतीय चलनात त्याची किंमत तब्बल 3,01,88,506.25 रुपये होईल.

Advertisement

आता तुम्हाला वाटेल 3 कोटीपेक्षा अधिक किमतीला हा बूट विकला गेलाय म्हणजे यात नक्कीच सोने किंवा हीरे लावलेले असतील. मात्र तुमच्या मनात जे काही चालले आहे, तसे काही नाही. या बुटाला हीरे किंवा सोन्याने मढवलेले नाही.

Advertisement

न्यूयॉर्क-मुख्यालय लिलाव हाऊसच्या म्हणण्यानुसार, या २०१९ च्या लिलावाने 2017 च्या सर्वात महागड्या बूट विक्रीच्या किमतीचा विक्रम मोडला. जो 1,90,373 डॉलरमध्ये विकला गेला होता. तो बूट मायकल जॉर्डनने 1984 च्या ऑलिम्पिक बास्केटबॉल फायनलमध्ये घातला होता.

Advertisement

आता आपण बोलूयात मूळ विषयावर…

Advertisement

जगातील सर्वात महागडा ठरलेल्या या बुटाची किंमत ‘Moon Shoe’च्या लिलावापूर्वी अंदाजे 160,000 डॉलर या बुटची किंमत ठरवली जात होती. अखेर हा बूट तिप्पट किमतीला विकला गेला. कॅनडाचे कलेक्टर माईल्स नदालने हा बूट विकत घेतला.  

Advertisement

ऑलिम्पिक ट्रायल्सच्या धावपटूंसाठी 1972 मध्ये नाईकचे सह-संस्थापक बिल बोव्हरमन यांनी ‘मून शू’ च्या 12 जोड्या बनवल्या. लिलावात विकला गेलेला हा एकमेव बूट होता, जो आजपर्यंत कुणीच वापरलेला नव्हता. इतर 11 बूट वापरले गेले होते.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply