मगरीची खरी ताकद पाण्यातच असते. तिला निष्प्रभ करायचे असेल तर तिला पाण्याबाहेर आणून तिच्यावर हल्ला करावा लागतो. किसान आंदोलन जोवर आपल्या पकडीनिशी दिल्लीच्या सीमांवर स्थिरावत होते. तोवर त्याला गालबोट लावण्याची सरकारसह कुणाची हिंमत होत नव्हती. या आंदोलनात ते बदनाम व्हावे म्हणून घातपाताचे प्रकार झाले नाहीत असे नाही. पण दोषींना तात्काळ पकडून खड्यासारखे बाहेर काढणे आंदोलनाला शक्य झाले.
लेखक : गिरधर पाटील (शेती विषयाचे अभ्यासक, नाशिक)
आंदोलकांचा संयम व प्रगल्भता त्या आंदोलनात कुणाला घूसू देत नव्हती. अगदी पोलिस वा सैन्यबळाची देखील मने किसान आंदोलकांनी जिंकली होती. त्यात महिला व मुलांचा सहभाग त्याला एक नवे कौटूंबिय मानवतावादी चेहरा देत होते. असे दिवसेंदिवस बांधले जाणारे व बळकट होणारे आंदोलन सरकारच्या दृष्टीने मोठी अडचण ठरु लागली होती व त्यात लुडबुड करण्याची संधीही मिळत नव्हती.
सरकारला २६ जानेवारीच्या कोंडीत पकडण्याचा आंदोलनाचा प्रयत्न सरकारने बरोबर एनकॅश केला. त्यांना आपल्या स्थानावरून हलवत आपला हस्तक्षेप करत दंगली घडवतांना वापरले जाणारे तंत्र बरोबर वापरत आंदोलनाला बदनाम करण्यात सरकार यशस्वी झालेय. गेल्या काही काळातील देशातील दंगली बघितल्या तर त्या धार्मिक वा जातीय भासवले जात असले तरी त्या घडवण्यामागे एक विशिष्ठ तंत्र विकसित झाले असून काही तत्वांना हाताशी धरून त्या घडवून आणल्या जातात.
आंदोलक म्हणून आंदोलनात आपली हिंसाचार करणारी माणसे घुसवायची व आंदोलनाला दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निमित्त मिळवायचे असे हे तंत्र आहे. शाहीन बाग आंदोलनातील माथेफिरु व आताचा सिध्दू ही त्याची उदाहरणे. लाल किल्ल्यावर जो जमाव गोळा झाला होता त्यांच्या व सीमेवरच्या आंदोलकांच्या मानसिकतेत प्रचंड तफावत दिसत होती. समोर पोलिस दिसत असूनसुध्दा कुणीही त्यांना घाबरत नव्हते. पोलिसांनी आपली बचावाची भूमिका पुरेपुर बजावल्याचे दिसते.
आपले कुणी काही करु शकत नाही अशा अविर्भावात आंदोलन पुरेसे बदनाम होईल अशी काळजी घेण्यात आली. आता चौकशीचा फार्स होईल पण त्यातून फारसे निष्पन्न होणार नाही याची काळजी घेतली जाईल. लाल किल्ल्याचे स्थान निवडण्यातही इतर नागरी वस्त्या ज्यात ओळख पटवणे शक्य होते वा होणाऱ्या जिवितहानिमुळे जनतेचा रोष पत्करण्याची शक्यता असते. ते टाळत सारे मिशन पार पडेपर्यंत सारे बिनबोभाट पार पाडता आले.
एरवी अशी निरवता शहराच्या नागरी वस्तीत मिळत नाही. माध्यमे ज्या त्वेषाने आंदोलनावर तुटून पडली आहेत त्यातून सरकारला आता बळ मिळत आहे. आजवर आंदोलनाने जे काही मिळवले होते ते बाजूला पडत सरकारला कारवाईसाठी पाऊल ठेवण्यात जागा मिळाली. आता मात्र आंदोलनाला नवी रणनिती ठरवावी लागेल व त्यात वर्गीय मागण्यापेक्षा देशातील एकंदरीतच लोकशाहीची होणारी फरफट व अवहेलना थांबवत साऱ्या देशाला वास्तव परिस्थितीची जाणीव करुन देत उठाव करावा लागेल.
सदरचा उठाव हा प्रचलित अर्थाने माध्यम केंद्रित न ठेवता एका सुप्त पातळीवर काम करत निवडणुक हेच मोठे आंदोलन समजत तशी आखणी करावी लागेल. अशा प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या शक्यता गृहित धरत त्या कशा असाव्यात याचा फारसा आग्रह न धरता सत्ताबदलाचे अंतिम ध्येय कसे गाठता येईल याचा विचार व्हावा. आज विरोधकांना नामशेष करण्यात ज्या पध्दतीने इडी, सीबीआय, आयकर, करसंकलन यांचा वेचक वापर होऊ लागला आहे त्याच धर्तीवर सामान्य नागरिकांना जेरीस आणण्यासाठी वाहन व वाहतुकीचे कायदे, बँकिग व आर्थिक निर्बंध, सक्तीच्या वसूल्या आणत इंधनाच्या दराचे कोलित वापरत त्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न होईल. यात कायदा पालनाच्या नावाखाली भ्रष्टाचार माजेल तो वेगळाच.
अंधभक्त लाभार्थी व स्वतंत्र विचाराची सामान्य जनता यात एकदा का फूट पडली की थोड्या पण निश्चित मतदानावर निकाल लावत या शक्ती परत सत्तेवर येऊ शकतील. आपण डावे उजवे करत आटापाट्या खेळत आलेली संधी गमवायची की एकच ध्येय ठेवत आपले जीवन सुकर करायचे याचा निर्णय आता तुमच्याच हाती आहे. शहाण्यास सांगणे न लगे !!
स्त्रोत : फेसबुक पोस्ट
*(ता. क. : या लेखामधील मत आणि विचार हे लेखकांचे वैयक्तिक विचार आहेत. आपणास याच्या विरोधात किंवा समर्थनार्थ काहीही लिहायचे असल्यास मेलवर किंवा व्हाट्सऍपवर आम्हाला आपले लेखन पाठवा. आम्ही त्यास प्रसिद्धी देऊ.)
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य