Take a fresh look at your lifestyle.

हवामान बदल म्हणजे वैश्विक आणीबाणी; पहा नेमके काय आलेत सर्वेक्षणाचे मुद्दे

ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द मागील दशकात अवघ्या जगाच्या परिचयाचा झालेला आहे. हे एक खूप मोठे आणि व्यापक असे वैश्विक संकट आहे. मात्र, अजूनही जगाला आणि त्यातील देशांना याची तीव्रता जाणवलेली नाही. त्यावरच सर्वेक्षण अहवाल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) व ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केला आहे.

Advertisement

यात ५० देशांतील १२ लाख लोकांची याद्वारे पाहणी केली. हवामान बदल ही एक वैश्विक आणीबाणी असल्याचे मत यात ५९ टक्के भारतीयांनी व्यक्त केले. २०१९ मध्ये हवामान बदलामुळे जगभरात होत असलेल्या पर्यावरणाच्या हानीविषयी १६ तरुणांनी सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार असे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते.

Advertisement

कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या पाहणीतील लोक मोबाइल गेमिंग नेटवर्कच्या माध्यमातून संपर्कात आलेले आहेत. जागतिक महामारी असतानाही ६४ टक्के लोकांनी हवामान बदल हीच मोठी समस्या मानली होती.

Advertisement

मुद्दे असे :
७४ टक्के लोकांनी हवामान बदल ही आणीबाणी असल्याचे म्हटले.

Advertisement

श्रीमंत देशांतील ७२ टक्के, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील ६२ टक्के लोक व कमी विकसित देशांतील ५८ टक्के लोकांनी हवामान बदल ही आणीबाणी असल्याचे म्हटले.

Advertisement

यावर अक्षय ऊर्जा हेच उत्तर असल्याचे मत ४४ टक्के भारतीयांचे आहे.

Advertisement

५२ टक्के भारतीयांनी हवामान बदलाच्या दृष्टीने कृषी व ५० टक्के लोकांनी पर्यावरण अनुकूल व्यापार आणि रोजगारावर भर दिला.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply