Take a fresh look at your lifestyle.

संशोधक डॉ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन; शेतकरी संघटनेसोबत करत होते काम

औरंगाबाद :

Advertisement

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, शास्त्रज्ञ डॉ. मानवेंद्र सखाराम काचोळे (६८) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले.

Advertisement

जवखेडा (ता. कन्नड) येथील ते मूळ रहिवासी होते. मे २०१४ मध्ये विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख पदावरून डॉ. काचोळे सेवानिवृत्त झाले होते. सन २००९-१० या काळात कुलसचिव ते विद्यापीठात कुलसचिव पदावर कार्यरत होते.

Advertisement

सेवानिवृत्तीनंतर शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी काम केले. सध्या ते संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत होते. २००४ मध्ये या पक्षातर्फे त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Advertisement

सध्या एमजीएम विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागात ते संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातून शोक व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply