Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : ‘द डेथ क्लॉक’मुळे चिमुरड्याने संपवले जीवन; पहा कशी न कुठे घडली दुर्दैवी घटना

आधुनिक जगात इंटरनेट हा परवलीचा शब्द बनला आहे. मात्र, त्याच्या वापराचे शास्त्र अजूनही न समजलेल्या लोकांना यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. असाच प्रकार जळगावमधील एका कुटुंबाच्या वाट्याला आलेला आहे.

Advertisement

हर्षल दीपक कुंवर (वय १४, रा. शिंदखेडा, जि. धुळे) हा आपल्या मामांकडे जळगावला आलेला होता. मागील चार महिन्यांपासून तो तिथे मोबाईलवर अभ्यास करतानाच आनंदाने राहत होता. मात्र, प्रजासत्ताक दिनी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

Advertisement

‘द डेथ क्लॉक’ या वेबसाइटवर आयुर्मान कॅलक्युलेटर दाखवले जाते. त्यातील मृत्यूचे भाकीत बघून त्याने हे असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तसेच हे संकेतस्थळ बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement

हर्षल हा आठवीच्या वर्गात शिकत असून जळगाव शहरातील तुकारामवाडी येथे राहणारे दीपक गोकुळ भदाणे नावाच्या मामाकडे राहत होता. वडिलांनी त्याला अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिलेला होता. त्यावर तो अभ्यास करीत होता. दरम्यान, त्याने ही वेबसाईट पाहिली आणि असे कृत्य केल्याचे समजते.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply