Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या अडीच एकरात शेती करणार्‍या 105 वर्षीय आज्जीला मिळालाय कृषी कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार; वाचा ‘या’ आज्जीची भन्नाट कहाणी

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले. यावेळी 7 दिग्गजांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी तामिळनाडूतील 105 वर्षीय एम. पप्पममल यांचेही नाव आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

Advertisement

एम. पप्पममल असे या आजींचे नाव असून त्यांचे वय 105 आहे.  तामिळनाडूच्या कोयंबटूर येथील थेककंपट्टी खेड्यातील त्या रहिवासी आहेत. गेली अनेक वर्षे त्या सेंद्रिय शेती करीत आहे. गावात त्यांचे एक दुकानही आहे. त्या अनेक दशकांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. त्याची शेती भवानी नदीच्या काठावर आहे.

Advertisement

एवढेच नाही तर या आज्जी गावातील इतर शेतकर्‍यांना, पाहुण्यांना सेंद्रिय शेती करण्यास सांगतात. एम. पप्पममल यांच्याकडे अवघी अडीच एकर जमीन आहे. त्या शेतात डाळी, भाज्या, बाजरी इत्यादींची लागवड करतात. वृद्ध असूनही त्या आजही शेतात अतिशय आरामात काम करतात.

Advertisement

पप्पममल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हे घोषित होताच त्याच्या घरी इच्छुकांची गर्दी झाली होती. इतकेच नाही तर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणनेही त्यांचे कौतुक केले आहे.

Advertisement

त्या शेतीशी संबंधित इतर कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात. यासाठी देखील त्या ओळखल्या जातात. एवढेच नाही तर एम. पप्पममल या तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या सल्लागार समितीचाही भाग आहेत. राजकारणातही त्यांनी आपले नशीब आजमावले आहे. एम. पप्पममल या थेककंपट्टी पंचायतच्या प्रभाग सदस्य म्हणून निवडूनही आल्या होत्या. यावर्षी तामिळनाडूमधून एकूण 10 लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply