Take a fresh look at your lifestyle.

आयटीमध्ये भारतीयांचाच बोलबाला; पाहा टाटांच्या TCS ने कोणती कमाल केलीय ती

जगभरात माहिती-तंत्रज्ञान व्यवसायात भारतीय कंपन्या आणि इंजिनीअर मंडळींचा बोलबाला आहे. त्यालाच आणखी उजाळा देणारी ही बातमी आहे. कारण, जगातील 10 बड्या आयटी कंपन्यांमध्ये 4 भारतीय कंपन्यांचा समवेश आहे.

Advertisement

ब्रँड फायनान्सच्या अहवालानुसार सध्या जगात पहिल्या नंबरावर अॅक्सेंचर आणि दुसऱ्यावर आयबीएम कंपनी आहे. तर, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो यांचा जगातील टॉप 10 सर्वात मौल्यवान आयटी कंपन्यांचा समावेश आहे. 

Advertisement

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) हा जगातील तिसरा सर्वात मौल्यवान आयटी (माहिती तंत्रज्ञान) सेवा ब्रँड ठरला आहे. टीसीएसचे ब्रँड व्हॅल्यू ११ टक्क्यांनी वाढून १५ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. अॅक्सेंचर कंपनीचे ब्रँड व्हॅल्यू २६ अब्ज डॉलर आहे. आयबीएम १६.१ अब्ज डॉलरच्या ब्रँड मूल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Advertisement

आयटी कंपन्यांच्या यादीत इन्फोसिस चौथ्या क्रमांकावर आहे. कंपनीचे ब्रँड व्हॅल्यू १९ टक्क्यांनी वाढून ८.४ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. या यादीत एचसीएल सातव्या, तर विप्रो नवव्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत टेक महिंद्रा १५ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीचे ब्रँड व्हॅल्यू ११ टक्क्यांनी वाढून २.३ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. एलटीआय २१ व्या स्थानावर असून त्याची ब्रँड किंमत ९८.२ दशलक्ष डॉलर्स असून त्यात ३७ टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply