Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : फडणविसांच्या निर्देशांची पायमल्ली; ‘त्यांच्या’ भूमिकेवर ठरणार प्रचाराची दिशा

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा आणखी रंगत येणार आहे. कारण, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच निर्देशांची पायमल्ली करण्यात आल्याचे उघड झालेले आहे. त्यामुळे आता फडणवीस कोणते निर्देश देणार आणि त्यांचे पालन कोण करणार यावर या निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे.

Advertisement

दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी बँकेसाठीचे मतदान होणार आहे. दरम्यान, आज (बुधावारी) अर्जांची छाननी पप्रक्रिया पूर्ण होणार आहे. मग उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कार्यवाही होईल. तोपर्यंत रिंगणात कोण टिकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, यंदाही या निवडणुकीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे एकाकी पडले आहेत. कारण, फडणवीस यांच्या निर्देशांची पायमल्ली करून भाजपचे नेते आणि मतदार महाविकास आघाडीच्या गोटात दिसत आहेत.

Advertisement

यंदा या निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ताकद आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत. मात्र, भाजपमध्ये उभी फुट पडण्याची चिन्हे आहेत. कारण, संगमनेर येथील थोरात यांच्या बैठकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती.

Advertisement

फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन या निवडणुकीसाठी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे व विखे या तिघांची समिती स्थापन केली होती. मात्र, समितीमधील कर्डिले हे थोरात यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. तसेच कोपरगावमधील भाजपचे उमेदवार विवेक कोल्हे हेही या बैठकीत होते. त्यामुळे फडणवीस यांचे निर्देश कितपत सिरीयस घेतले जातील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Advertisement

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याचे म्हटले जाते. इथे व्यक्तीकेंद्रित राजकारण करण्यास पुरेसा वाव नाही. विखे हे सध्या जिल्ह्यात पक्षाला लीड करतात. त्यांचे पुत्र सुजय विखे हे खासदार आहेत. त्यामुळे विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी नसल्याचा संदेश तर स्थानिक नेते देत नाहीत ना, अशीच चर्चा आहे. त्यातही आता फडणवीस कोणती भूमिका घेतात यावर यातील पक्षीय गणित आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply