Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : कर्डिलेंच्या भूमिकेवर भाजपची मदार; विखे पडलेत एकाकी..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल 312 उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक चुरशीची होणार याचेच संकेत मिळाले आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातेलेले आहे. परिणामी ही यंदाची निवडणूक बाळासाहेब थोरात विरुध्द राधाकृष्ण विखे पाटील अशी न राहता थेट महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी बनली आहे. मात्र, त्यात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावरच भाजपची मदार असणार आहे.

Advertisement

विखे-कर्डिले आणि विखे-थोरात यांच्यातील राजकीय वाद आता जिल्ह्याच्या परिचयाचा आहे. तरीही खासदारकीच्या निवडणुकीत कर्डिले यांनी भाजप उमेदवार असलेल्या सुजय विखे यांच्या खांद्याला खांदा लावून विजय खेचून आणला होता. तत्पूर्वी राहुरी येथेही साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे-कर्डिले एकमेकांच्या समवेत होते. मात्र, आता कर्डिले पुन्हा एकदा थोरात यांच्या बैठकीत सहभागी झाल्याने भाजपमध्ये या निवडणुकीत उभी फुट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

Advertisement

अशा पद्धतीने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांची कोंडी करण्यासाठी शरद पवार यांच्यासह पुन्हा एकदा त्यांचे जिल्ह्यातील सर्वपक्षीय विरोधक सरसावले आहेत, असेच चित्र निर्माण झालेले आहे. अगदी मुंबईत भाजपने एकत्रितपणे ही निवडणूक लढण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही कर्डिले मात्र महाविकास आघाडीच्या गोटात दिसले आहेत. त्यावर बोलताना त्यांनी, विखेंनी आजवर घालून दिलेल्या मार्गानेच आम्ही काम करीत आहोत असा खोचक टोला मारला आहे.

Advertisement

कर्डिले महाराष्ट्र टाईम्स यांच्याशी बोलताना म्हणाले आहेत की, महसूल मंत्री थोरात यांनी फोन करून बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आम्ही गेलो होतो. बैठकीत चर्चा झाली. भाजपच्या समितीत आपण आहोत, हे खरे आहे. मात्र, या समितीचे नेमके काम अद्याप कळालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समन्वय करा, असे सांगितले होते, त्यानुसार ते केले.

Advertisement

फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे व विखे या तिघांची समिती थापन केली आहे. त्यातील कर्डिले आणि भाजपचे उमेदवार विवेक कोल्हे हे थेट थोरात यांच्या बैठकीत होते. त्यामुळे यंदा या निवडणुकीत पुन्हा एकदा विखे एकाकी पडले आहेत. कर्डिले यांची अहमदनगरसह पारनेर, श्रीगोंदा व राहुरी तालुक्यातही मोठी ताकद आहे. त्यामुळे आता फडणवीस कोणते निर्देश देतात आणि कर्डिले कोणत्या पारड्यात आपले मत टाकतात यावर या निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply