Take a fresh look at your lifestyle.

भारताविषयीच्या ‘या’ 9 गोष्टी तुम्हाला नक्कीच नसतील माहिती; वाचून व्हाल आश्चर्यचकित

  1. हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाही :- भारतीय राज्यघटनेत भारताच्या राष्ट्रीय भाषेचा उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारताला राष्ट्रीय भाषा नाही. राज्यघटनेच्या 8th व्या अनुसूचीनुसार, भारत सरकारने अधिकृत भाषा म्हणून हिंदीसह २२ भाषांचा समावेश केला आहे.
  2. भारताचा स्वतःचा कोणताही ‘राष्ट्रीय खेळ’ नाही :- महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शालेय शिक्षकाने दाखल केलेल्या आरटीआयला उत्तर देताना केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की केंद्राने कोणत्याही खेळाला देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केले नाही. तथापि, हॉकीला भारताचा ‘राष्ट्रीय खेळ’ म्हटले जाते.
  3. यूएसबी पोर्ट शोध एका भारतीय संगणक तज्ञाने लावला होता. भारतीय वंशाचे संगणक तज्ञ अजय व्ही. भट्ट यांनी २१ व्या शतकात सर्वाधिक वापरला जाणारा ‘यूएसबी पोर्ट’ शोधला.
  4. भारतात 1 रुपयाचे नाणे बनवण्यासाठी 1.11 रुपये खर्च येतो. २ रूपयांचे नाणे बनवण्यासाठी  1.28 रुपये खर्च येतो. पाच रुपयांचे  नाणे बनवण्यासाठी 3.69 रुपये खर्च येतो.
  5.  जगातील सर्वात मोठी शाळा भारतात आहे. लखनौच्या ‘सिटी मॉन्टेसरी स्कूल’ ने विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदविला आहे.
  6. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाते.  भारतातील 11.38% लोकांना इंग्रजी भाषा माहिती आहे.
  7. 1963 मध्ये भारताचे पहिली रॉकेट व उपग्रह सायकल व बैलगाडीद्वारे चाचणीच्या ठिकाणी नेण्यात आले. कारण तेव्हा हे सर्व नेण्यासाठी दुसरी सोय नव्हती.
  8. होय, हे देखील खरं आहे की भारतानेच जगाला बटणाविषयी माहिती दिली. सर्वात प्रथम भारतात बटणाचा वापर करण्यात आला.
  9. सुश्रुत नावाच्या एका प्राचीन भारतीय शल्य चिकित्सकाने सहाव्या शतकात ‘प्लास्टिक आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया’ क्षेत्रात वैद्यकीय शास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply