देशभरात खाद्यतेलाचे भाव सध्या वाढलेले आहेत. अशावेळी परदेशी आयातीवर अवलंबून न राहता देशाला तेलबिया क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठीची पावले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उचलली आहेत. त्यासाठी नवीन योजना आणून त्यावर तब्बल 75 हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सरकारने केली आहे.
इकॉनॉमिक टाईम्स यांनी याची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, कृषी मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पात खाद्यतेलसाठी 19,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अभियानाचा प्रस्ताव पाठविला आहे. या अभियानांतर्गत खाद्य तेलांची आयात कमी करण्यासाठी आणि उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी पंचवार्षिक योजना सुरू नील. त्याचा वार्षिक खर्च 75,000 कोटी आहे.
देशात तेलबिया उत्पादनात वाढ झाल्यास मगच स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती खाली येतील. भारत प्रतिवर्षी एकूण देशांतर्गत मागणीच्या सुमारे 70 टक्के तेलाची आयात करतो. हीच आयात शून्य टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य कृषी कल्याण मंत्रालयाने ठेवले आहे.
सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी.व्ही.मेहता म्हणाले की, या क्षेत्राला चालना देण्यासाठी 5 ते 10 हजार कोटींचा निधी तयार केला जाऊ शकतो. हे अभियान सुरू झाल्यास एक गेम चेंजर ठरणार आहे. कारण ते सरकार, घरगुती उद्योग, शेतकरी तसेच ग्राहकांसाठीही महत्वाचे आहे. यामुळे देशातील चालू खात्यातील तूट कमी होईल. उद्योग स्पर्धात्मक होईल, तसेच शेतकरी अधिक पैसे कमवतील तर ग्राहकांना स्वस्त दराने स्वयंपाकाचे तेल मिळेल.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव