Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : चक्क 50 कोटी फेसबुक वापरणार्‍यांचा फोन नंबर डेटा विकण्यासाठी रेडी; 60 लाख भारतीयांना असा बसणार झटका

दिल्ली :

Advertisement

टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गाने पुढे जात आहोत. आपले प्रश्न कमी व्हावेत, आपल्यासमोरील मोठ्या अडचणी सुटाव्यात, अशी भूमिका टेक्नॉलॉजीचा वापर करण्यामागची आहे. डिजिटल आणि टेक्नॉलॉजीच्या जगात वावरत असताना आपले प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रायव्हसीचा. असाच प्रायव्हसीचा बट्ट्याभोळ झाल्याची एक बातमी आताच आपल्यासमोर आली आहे.

Advertisement

50 कोटीहून अधिक फेसबुक वापरकर्त्यांचे मोबाइल फोन नंबर टेलिग्रामद्वारे विकण्यासाठी दिले जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सायबर आणि वैयक्तिक सुरक्षेचा मोठा भंग आहे. सुरक्षा संशोधक एलन गॅल (मदरबोर्ड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 60 लाखाहून अधिक भारतीय वापरकर्त्यांच्या फोन नंबरचा डेटा समाविष्ट आहे. हा प्रकार गॅल यांनी ट्विटरवर प्रथम उघडकीस आणला आहे. गॅल म्हणाले होते की, सोशल मीडिया कंपनीतील त्रुटीमुळे कंपनीने 2019 मध्ये लपवलेल्या 533 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांची माहिती समोर आणली होती.

Advertisement

फेसबुकवरुन या लोकांचे नंबर घेतले जात आहेत. आणि दमदार किमतीला विकले जात आहेत. 12 जानेवारी 2021 पासून टेलिग्राम वरुन हा प्रकार चालवल्याची बातमी आहे, परंतु दिलेला डेटा 2019 चा आहे. तथापि, डेटा अचूक असू शकतो. कारण खूपच कमी लोक त्यांचे फोन नंबर बदलतात. सुरक्षा संशोधकाच्या मते, या प्रकरणात 100 हून अधिक देशांमधील वापरकर्त्यांचे डेटा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply