मुंबई, दि. 27 : (प्रेसनोट)
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज शाळेची घंटा वाजली असून राज्यातील 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या काही शाळांमध्ये शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
आजपासून राज्यांत ५ ते ८ वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील, ठाणे तसेच नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील शाळा सोडून राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी प्रा.गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांतील म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन मुलांच्या व शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
यावेळी सोबत शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कोविडसंदर्भातील सर्व खबरदारी घेऊन सुरु करण्यात आलेल्या शाळांपैकी सकाळी पुणे महानगरपालिका हद्दीतील आपटे प्रशाला व मॅार्डन शाळा या दोन खाजगी व हुतात्मा शिरीष कुमार या मनपा च्या शाळेतील ९-१० इयत्तेच्या शाळेलाही त्यांनी भेट दिली.
शाळांतील सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. जे मुल आजारी आहे, किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहन प्रा.गायकवाड यांनी केले आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट