Take a fresh look at your lifestyle.

म्हणून उठला बलाढ्य चीनी कंपनीचा बाजार; पहा कशामुळे वाजले कंपनीचे तीनतेरा..!

चीनमध्ये बनवलेला माल अवघ्या जगभरात जातो. कमी किमतीत माल देण्याच्या चीनी कंपन्यांमुळे असे शक्य झाले होते. मात्र, काळानुरूप चीनचा बाजार वाढत असतानाचा आडमुठेपणा वाढला. परिणामी आता भारतासह अमेरिका आणि इतरही अनेक देशांनी चीनी कंपन्यांना बंदी घालण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच झटका बसल्याने हुवावे ही बलाढ्य कंपनी संकटात आलेली आहे.

Advertisement

चीनी सैन्याशी संबंधित असल्याचा संशय बळावत गेल्याने या कंपनीला जगभरातील अनेक बाजारातून ही कंपनी आता गायब होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे स्मार्टफोन विक्रीच्या सेक्टरला या कंपनीने आता बाय—बाय करण्याची तयारी केली आहे.

Advertisement

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शांघाय सरकारच्या समर्थित कन्सोर्टियमवर हुवेईच्या खरेदीविषयी चर्चा सुरू झाली आहे. हुआवेईचा पी ब्रँड आणि मेट या स्मार्टफोन ब्रँडची विक्री करण्याचे कंपनीने ठरवले आहे. कंपनी प्रीमियम स्मार्टफोनमधून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या, स्मार्टफोनसाठी ही कंपनी चिप्सची इन-हाऊस निर्मिती करीत आहे. हुआवेने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्रँडची विक्री करण्याच्या संभाव्यतेचा शोध सुरू केला असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

हुवावेची सुरूवात 1987 मध्ये झाली होती. कंपनीत सध्या सुमारे 1,80,000 कर्मचारी कामावर आहेत. सॅमसंगनंतर हुआवे ही जगातील दुसर्‍या क्रमांकाचा चीप पुरवठा करणारी कंपनी आहे. स्मार्टफोन बाजारात कंपनीचा हिस्सा 18 टक्के आहे. अॅपल व इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या बाजाराच्या तुलनेत तो जास्त आहे. हुवावे कंपनीचे संस्थापक रेंग झेंगफेई हे सत्ताधारी हुकुमशाही कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी 9 वर्षे चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये काम केले आहे. रेन झेंगफेई यांनी 1974 मध्ये चिनी सैन्यात अभियंता म्हणून काम सुरू केले होते. पुढे त्यांनी 1987 मध्ये हुवावे कंपनीची पायाभरणी केली.

Advertisement

कंपनीकडे उच्च श्रेणीचे टेलिकॉम उपकरणे आहेत. 5 जी तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी जगभरातील उर्वरित कंपन्यांपेक्षा खूप पुढे आहे. पण आता चिनी सैन्याशी असलेल्या संबंधामुळे हुवावे कंपनीला अमेरिकेसह जगातील बर्‍याच देशांमध्ये निर्बंधांना सामोरे जावे लागले आहे. यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply