Take a fresh look at your lifestyle.

बजेटमध्ये मिळणार शेतकऱ्यांना दिलासा; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेणार मोदी सरकार

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काहीच तास शिल्लक आहेत. अशावेळी एक महत्वाची बातमी येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अनेक योजनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

मागील आर्थिक वर्षात कृषी कर्ज वाटपाचा लक्षांक 15 लाख कोटी रुपये होता. पुढील अर्थसंकल्पात त्यात घसघशीत वाढ करून हा लक्षांक तब्बल 19 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या सूत्रांनी राष्ट्रीय माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

संस्थात्मक स्त्रोतांकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकार आणि व्याजखोर स्त्रोतांकडून कर्ज घ्यावे लागत नाही. साधारणत: कृषी कर्जावरील व्याज 9 टक्के असतो. परंतु सरकार व्याज सहाय्य देते जेणेकरून अल्प मुदतीसाठी शेतीसाठी कर्ज स्वस्त दरात आणि कृषी उत्पादनास चालना देण्यासाठी उपलब्ध व्हावी.

Advertisement

सरकार शेतकर्‍यांना 2 टक्के व्याज अनुदान देते जेणेकरुन त्यांना 7 टक्के व्याजावर अल्प कालावधीसाठी प्रभावीपणे 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. याशिवाय जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना तीन टक्के मदत दिली जाते. मग हे कर्ज फ़क़्त 4 टक्के व्याजदरानेच शेतकऱ्यांना मिळते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply