Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शेतकऱ्यांना अच्छे दिन; हमीभावात तब्बल ३७५ रुपयांची वाढ

बजेटच्या घोषणेपूर्वी आणि शेतकरी आंदोलन हिंसक झालेले असतानाच केंद्र सरकारने खोबरे उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. खोबऱ्याच्या हमीभावात तब्बल ३७५ रुपये प्रतिक्विंटल इतकी दमदार वाढ करण्यात आलेली आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीत झालेला निर्णय जावडेकर यांनी सांगितला. ते म्हणाले की, एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ३७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वीचा एमएसपी प्रति क्विंटल ९९६० रुपये होता, जो आता वाढवून १०,३३५ रुपये झाला आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) has approved MSP of copra at Rs 10,335 per quintal, an increase of Rs 375 over 2020 rates: Union Minister Prakash Javadekar https://t.co/UORwMbvkvc” / Twitter

Advertisement

जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की स्वामीनाथन अहवालातील शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांची ४० वर्षांची मागणी यानिमित्ताने पूर्ण केली आहे. यूपीए सरकारने बर्‍याच दिवसांपासून स्वामीनाथन अहवाल लागू केला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार त्या शिफारसी लागू करत आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply