मागील सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अखेर पुन्हा एकदा फुटीच्या मार्गावर आहे. यापूर्वी एकदा उत्तरप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांनी फुट पाडली होती. आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसक घडामोडीमुळे याला फुटीची लागण झालेली आहे.
शेतकरी नेते राजेश टिकैत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता एकमेकांवर आरोप करण्यासही आंदोलकांनी सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये टिकैत हे झेंडा आणि काठ्या घेऊन यायला सांगत आहेत. त्यावर टिकैत यांनी काठीशिवाय झेंडा कसा लावायचा, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
मात्र, त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन महिने शांतपणे चालू असलेले हे आंदोलन हिंसक झाल्याने शेतकरी आंदोलनाची मोठी हानी झाली आहे. हे आंदोलन अगोदरच भाजपने बदनाम केले होते. त्यात आता सर्वत्र यावर टीका सुरू झाल्याने आंदोलनातील हवा निघण्यास सुरुवात झालेली आहे.
दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे की, त्यांच्या एफआयआरमध्ये (किसान ट्रॅक्टर रॅलीच्या संदर्भात एनओसीच्या उल्लंघनासाठी) शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल आणि जोगिंदरसिंग उगरा यांची नावे आहेत. बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचेही एफआयआरमध्ये नाव आहे.
शेतकरी नेते व्हीएम सिंग यांनी या आंदोलनातून माघार घेतली असून राकेश टिकैत व इतर शेतकरी नेत्यांवरही अनेक आरोप केले आहेत. व्हीएम सिंह म्हणाले की, ज्यांनी त्यांना चिथावणी दिली त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी.
व्हीएम सिंह म्हणाले की, जेव्हा सगळेजण 11 वाजता नाही तर रात्री 8 वाजता निघत होते, तेव्हा सरकार काय करीत होते? ही सरकारची चूक आहे. भारताचा ध्वज हा सन्मान आहे. जर त्या सन्मानाचे उल्लंघन केले गेले असेल तर ते चुकीचे आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव