Take a fresh look at your lifestyle.

अखेर मुहूर्त ठरला; ‘त्या’ तारखेला चेन्नईत भरणार क्रिकेटपटूंचा बाजार

इंडियन प्रीमिअर लीग या स्पर्धेसाठी खेळाडूंची बोली लावण्याची प्रक्रिया अखेर ठरली आहे. दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजी चेन्नई येथे त्यासाठी खेळाडूंचा बाजार भरणार आहे.

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या स्पर्धेसाठी ही बोली लावली जाणार आहे. ज्या भारतीय खेळाडूंकडे कोणताही संघ करारबद्ध नाही ते 4 फेब्रुवारीपर्यंत लिलावात भाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Advertisement

आयपीएलची मागील आवृत्ती युएईच्या मोकळ्या स्टेडियममध्ये सप्टेंबर – नोव्हेंबरमध्ये कोरोना साथीच्या दरम्यान खेळली गेली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार 14 वा हंगाम एप्रिल-मे महिन्यामध्ये नियोजित वेळापत्रकानुसार होईल. सामन्यांचे ठिकाण आणि तारखांची घोषणा बीसीसीआय करणार आहे.

Advertisement

मागील स्पर्धा 200 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिली होती. त्यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने त्यात बाजी मारली होती.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply