दिल्ली :
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गांगुली यांच्या छातीत दुखत होते तसेच त्यांना अस्वस्थही वाटत होते. काल रात्री मात्र या दुखण्याने त्यांना जास्त त्रास होऊ लागला.
आज अखेर ते त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. याच महिन्यात त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्या दरम्यान त्यांनी अँजिओप्लास्टीही केली गेली. अद्याप हृदयविकाराचा झटका आणि त्यावर अँजिओप्लास्टी होऊन महिनासुद्धा उलटलेला नसताना शुक्रवारी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक