Take a fresh look at your lifestyle.

निर्यात करताना प्लास्टिकबाबतचे नवे नियम घेतलेत का लक्षात; वाचा आणि अंमलबजावणी करा

भारतातून शेतमालाची निर्यात वाढत आहे. अशावेळी आता शेतमाल असो की कोणत्याही पदार्थांची निर्यात असोत, त्यासाठीचे सुधारित नियम जगभर लागू झालेले आहेत. त्यानुसार पुढील काळात संयुक्त राष्ट्र संघटनेने जारी केलेली नियमावली लक्षात घेऊनच निर्यातीचे नियोजन करा.

Advertisement

सध्या प्रदूषणाबद्दल प्रत्येकजण काळजीत असतो. प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी तज्ञ सातत्याने सूचना देत असतात. प्लास्टिक प्रदूषण समुद्र असो रस्ता असे सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे हे जगासमोरील हे एक मोठे आव्हान आहे. प्लॅस्टिकच्या वाढत्या प्रदूषणामुळे संयुक्त राष्ट्र संघाने विकसनशील देशांद्वारे विकसित केलेल्या प्लास्टिक उत्पादनांच्या नियमात बदल केले आहेत.

Advertisement

आता नव्या नियमानुसार अशा प्लास्टिक वस्तू श्रीमंत आणि विकसनशील देशांना पाठविल्या जाणार नाहीत, ज्याचे विघटन करता येणार नाही किंवा त्याचे रीसायकल करणे फारच अवघड आहे. प्लास्टिकच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी 1 जानेवारी 2021 पासून हे नवीन आंतरराष्ट्रीय नियम लागू केले आहेत.

Advertisement

या जागतिक संघटनेने पुढील पाच वर्षांत जागतिक स्तरावर समुद्र आणि त्याचा भाग स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युरोपियन युनियनने विकसनशील देशांमध्ये पुन्हा न रिसायकल करता येणारे प्लास्टिक वापरलेले पदार्थ पाठविण्यास बंदी घातली आहे.

Advertisement

असे म्हटले जाते की, उलट विकसित देशांकडून गरीब आणि विकसनशील देशांमध्ये पाठविल्या जाणार्‍या प्लास्टिक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात असे प्लास्टिक कचर योग्य प्रक्रिया न करता पाठवला जातो. त्यातील एक मोठा भाग जमिनीत जातो किंवा समुद्रात फेकला जातो. गरीब देशांमध्ये या प्लास्टिक उत्पादनांसाठी रिसायकल सिस्टीम नसतात. येथूनच खऱ्या अर्थाने प्लास्टिक प्रदूषणाचा व्यापक प्रसार होण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply