Take a fresh look at your lifestyle.

योगी आदित्यनाथ यांच्या आवडती गाय ‘नंदिनी’ला सांभाळणार ‘मोहम्मद’; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

Advertisement

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचे आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक व्यस्त झाले. पूर्वी ते त्यांच्या मंदिर आणि मठात विशिष्ट वेळ देऊ शकत होते, मात्र आता ते शक्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रशासकीय कामातून बाहेर पडून आपल्या वैयक्तिक आयुष्याला वेळ देण्यासाठी जास्त वेळ नसतो. ज्या मंदिरात योगी महंत आहेत, त्यांची अनेक कामेही प्रलंबित आहेत. गायींना संरक्षण देणे हे मुख्य काम आहे. हिंदू धर्मात गाय सर्वात पवित्र मानली जाते.

Advertisement

योगींनी आयुष्यात गायींची देखभाल व संरक्षण करण्यासाठी बराच काळ व्यतीत केला आहे. मंदिराच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, योगी दररोज पहाटे 3 वाजता उठतात आणि प्रार्थना करतात. त्यानंतर ते आपल्या गोठ्यात जातात आणि गायींना खुराक चारतात. गायींना खायला देण्यापूर्वी योगी न्याहारीही करत नाहीत. मंदिर परिसरातील सुमारे 2 एकर जागेवर गौशाला बांधली आहे. दररोज काही स्वयंसेवक 500 हून अधिक गायींची काळजी घेतात.या स्वयंसेवकांमध्ये मोहम्मद नावाचा मुस्लिम स्वयंसेवक देखील आहे. मोहम्मद लहानपणापासूनच येथे सेवा देत आहे.

Advertisement

योगी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या फेव्हरेट गाय असणारी नंदिनीची देखभाल मोहम्मद करत असतो. गायींना आंघोळ घालण्यापासून आणि त्यांच्यासाठी चारा देण्यापर्यंत सर्व काम मोहम्मद करतो. मोहम्मदचे वडील इनायतुल्लाह यांनी मोहम्मदला गोसेवा करण्यासाठी सांगितले होते. तेव्हापासून तो येथे सेवा देत आहे.

Advertisement

गौशालाचे प्रभारी सुनील राय म्हणाले की, आदित्यनाथ सर्व गायींना नावाने हाक मारतात आणि त्यांना खाऊ घालतात. त्यांना नंदिनी नावाची गाय सर्वाधिक आवडते. ते तिच्याकडे विशेष लक्ष देऊन असतात. गौशालामध्ये गुजराती, साहवाल, देसी आणि गीर यासह अनेक चांगल्या गायी आहेत. या गायी दररोज शेकडो लिटर दूध देतात. सर्व दूध भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी तूपही बनविला जातो. तसेच भंडारात दूध वाटप केले जाते, मात्र हे दूध कधीच विकले जात नाही.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply