दिल्लीमधील शेतकरी आंदोलनास हिंसक वळण देण्यासाठी आता अभिनेता दीप सिद्धू याला जबाबदार धरले जात आहे. शेतकरी नेत्यांनी आणि अनेकांनी त्याचावर हा आरोप करताना भाजप खासदार व सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल यासह अनेक भाजप नेत्यांसमवेतचे त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
त्यावर खासदार सनी देओल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देओल यांनी म्हटले आहे की, हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असलेला अभिनेता दीप सिद्धूशी काही संबंध नाही. त्याचा किंवा त्याच्या कुटुंबाचा आमच्याशी काही संबंध नाही. त्याच्या एका आठवड्याची कॉल रेकॉर्ड घ्या मगच खरे काय ते स्पष्ट होईल.
दरम्यान, सिद्धूचे देओल कुटुंबियांबरोबरच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शह, भाजप खासदार सनी देओल, भाजप खासदार हेमा मालिनी, अभिनेता धर्मेंद्र यांच्यासमवेतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातून स्पष्ट होते की, हा अभिनेता भाजपच्या गोटात आहे.
पंजाबी अभिनेता दीप सिद्धू हा दिल्लीतील हिंसक घटनांचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप आहेत. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या घटनांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सिद्धू म्हणाला आहे की, या रॅलीला उपस्थित असलो तरी त्यांनी राष्ट्रध्वज काढला नाही.
‘रमता जोगी’ या चित्रपटात पंजाबमध्ये जन्मलेला दीप सिद्धू मुख्य भूमिकेत होता. होते. यानंतर किंगफिशर मॉडेल हंटचा तो विजेताही होता. तिने ग्रासिम मिस्टर इंडियामध्ये त्याने भाग घेतला होता. ग्रासिम मिस्टर पर्सनालिटी आणि ग्रासिम मिस्टर टैलेंटेडही त्याने जिंकले आहे. सिद्धू यांनी हेमंत त्रिवेदी, रोहित गांधी आणि इतरांसारख्या अॅश फॅशन डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केले आहेत.
संपादन : महादेव गवळी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर