Take a fresh look at your lifestyle.

म्हणून नेमाडेंचा ज्ञानपीठ परत घ्या; मागणीसह ‘त्या’ संघटनेने केला गुन्हाही दाखल

जळगाव :

Advertisement

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांचा पुरस्कार पाठीमागे घेण्यासह त्यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

अ‍ॅड. भरत पवार यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिले आहे. त्यात पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे.  ‘हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक व आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरोधातदेखील गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply