Take a fresh look at your lifestyle.

युपी पोलिसांनी गंभीर आरोपांमुळे म्हशीलाच केले अटक; वाचा, हा भन्नाट किस्सा

दिल्ली :

Advertisement

यूपी पोलिसांचे आजवर आपण अनेक किस्से आणि कथा ऐकल्या असतील, ज्या ऐकून आपल्याला राग येतो किंवा हसू तरी येते. नुकतेच काही दिवसांपूर्वी अशीच एका घटना समोर आली आहे. लखीमपूर खेरी येथेही अशीच घटना उघडकीस आली असून पोलिसांनी एका म्हशीला ताब्यात घेतले आहे.

Advertisement

पलिया येथील बलदेव बैदिक इंटर कॉलेजमध्ये एक म्हैस बाउंड्री वॉल क्रॉस करून दाखल झाली होती. वन विभागाने गेल्या वर्षी या हद्दीत सरकारी झाडे लावली होती. म्हशीवर असा आरोप आहे की, ती या सरकारी झाडांना नुकसान करीत आहे. महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, भटके प्राणी काही मिनिटांत मोठ्या प्रयत्नाने वाढवलेली झाडे खाऊन टाकतात किंवा त्यांना नुकसान तरी करतात.

Advertisement

या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी तेथे येऊन एका म्हशीला अटक केली. या म्हशीने त्यांचे बरेच नुकसान केले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Advertisement

यूपीमध्ये म्हशीवर बऱ्याच काळापासून राजकारणात होत आहे. यापूर्वी आझम खा यांच्या हरवलेल्या म्हशींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण प्रशासन लावण्यात आले होते आणि आता या प्रकरणात म्हशीला दोषी ठरविण्यात आले होते. व्वा रे व्वा, यूपी पोलिस. 

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply