Take a fresh look at your lifestyle.

कालची चुकही गांधी-नेहरुंचीच; पहा बॉलीवूडच्या वरून ग्रोव्हरने नेमके काय म्हटलेय

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अशावेळी देशभरातून दोन्ही बाजूने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, सरकार व आंदोलक यांच्यात संवाद नसल्याने मार्ग निघालेला नाही. त्यातच बॉलीवूडचे सुप्रसिद्ध पटकथा लेखक वरून ग्रोव्हर यांनी कालच्या घटनेला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सगळी चूक ही नेहरू आणि गांधीजी यांची आहे. ना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते ना प्रजासत्ताक दिवस असता. भले त्यांचे हे ट्विट खोचक आहे. मात्र, त्यातून जनतेला आणि सरकारच्या प्रतिनिधींनाही संवादातून मार्ग काढण्याचा स्वातंत्र्यातावादी दृष्टीकोन अजिबात नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याके वरून यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

वरुण 🇮🇳 on Twitter: “सारी ग़लती नेहरु और गांधी की है। ना आज़ादी मिलती, ना Republic Day होता।” / Twitter

Advertisement

हिंसाचाराच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत. मात्र, किती शेतकरी जखमी झाले याची माहिती जाहीर झालेली नाही.

Advertisement

वरुण ग्रोवर हे स्वतंत्र लेखक आहेत. त्यांनी नेटफ्लिक्सवरील सुपरहिट सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची पटकथा लिहिली आहे. तसेच त्यांनी फॅन, उडता पंजाब, सोनचिडिया या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांचे ‘पेपर चोर’ हे पुस्तक देखील प्रसिद्ध झालेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply