Take a fresh look at your lifestyle.

‘हम दो, हमारे पाचसह हत्यार चालवणेही महत्वाचे’; पहा भाजप नेत्यांनी काय मुक्ताफळे उधळली..!

देशातील वाढती लोकसंख्या हाच मोठा प्रश्न बनलेला असताना आता सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी मुलांच्या जन्माच्या फॅक्टरी सुरू करण्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही भाजपच्या एका नेत्याने ‘हम दो, हमारे पाचसह हत्यार चालवणेही महत्वाचे’ असल्याचे सांगून टाकले आहे.

Advertisement

प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये झेंडावंदनानंतर भाजपच्या व्यापार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक असणाऱ्या विनीत अग्रवाल शारदा यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, हम दो हमारे पाचचा संकल्प करण्यासह मुलांना हत्यारे विकत घेणे आणि ती चालवणेही शिकवले पाहिजे.

Advertisement

त्यांनी आवाहन केले की, रामायणात महाराज दशरथ यांना चार पुत्र होते. हे चार पुत्र नसते तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशाला हम दो हमारे पाचची गरज आहे. असे झाले नाही भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळे हे आवश्यक आहे.

Advertisement

पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावे. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणे आणि ते चालवणे शिकवावे. एका मुलाला भारतीय लष्करात पाठावे. एकाला व्यापारी करावे आणि एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावे, असे ‘ठोस’ नोयोजन त्यांनी देऊन टाकले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply