प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले. या दुर्दैवी घटनेस नेमका कोण जबाबदार आहे हे पोलीस तपासात उघड होईल किंवा हे लवकरच समजेल. मात्र, तत्पूर्वीच या आंदोलनातील महत्वाचे नेते असलेल्या स्वराज अभियानचे नेते आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी योगेंद्र यादव यांच्या अटकेचा ट्रेंड ट्विटरवर सेट झाला आहे.
ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवर योगेंद्र यादव यांनी तीव्र संताप व्यक्त करून यादव यांनी याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही हिंसा कुणी केली आणि कुणी नाही केली हे मी आता सांगू शकत नाही. शेतकरी आंदोलनापासून आम्हाला दूर ठेवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनीच ही हिंसा भडकावली आहे. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच आपण जाऊ, या मार्गापासून विचलीत व्हायचं नाही, असं मी सुरुवातीपासूनच सांगतो होतो. आंदोलन शांततेत पार पडलं तरच आपण यशस्वी होऊ हे मी वारंवार शेतकऱ्यांना समजावून सांगत होतो.
ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेची मला लाज वाटतेय. त्याची मी जबाबदारी घेतो. सुरुवातीपासूनच मी शेतकरी आंदोलनाशी जोडला गेलो आहे. त्यामुळे काल जे काही घडलं त्याची मला लाज वाटतेय, असेच स्पष्टपणे योगेंद्र यादव यांनी म्हटलेले आहे.
काँग्रेस सरकारच्या कालावधीत अण्णा हजारे यांचे आंदोलन, आप या राजकीय पक्षाला दिल्ली राज्य ताब्यात मिळवून देण्यासह अनेक आंदोलन यादव यांच्या नावावर आहेत. राजकीय विश्लेषक म्हणून जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आता या हिंसाप्रकरणात यादव यांना गोवून आंदोलन बळकावण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळेही यादव यांच्या अटकेची मागणी होत असावी असे म्हटले जात आहे.
यादव हे या आंदोलनामागचे ब्रेन असल्याने त्यांच्या अटकेनंतर आंदोलन भरकटेल म्हणूनही त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाला कोणतंही गालबोट लागू नये, हे आंदोलन भरकटू नये म्हणून यादव यांनी सातत्याने काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरच या आंदोलनाचा कसा फोकस राहील आणि त्याला राजकीय वळण मिळणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे.
संपादन : महादेव गवळी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट