बॉम्ब टाकला तरी होणार नाही काहीच; पंतप्रधान मोदी वापरतात ‘ही’ स्वदेशी गाडी, वाचा जबरदस्त फीचर्स
दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या वस्तु वापरतात, कोणते पदार्थ खातात, त्यांच्या लाईफस्टाईलकडे भारतीयांचे लक्ष असते. कित्येक सामान्य लोकांना मशरूम हा पदार्थ माहिती सुद्धा नाही, असा महागडा मशरूम मोदी खातात. तसेच त्यांचा चश्मा, पेन आणि कपडेही भले महागडे आणि ब्रॅंडेड असतात. मात्र कालपासून चर्चेत आहे ती मोदींची गाडी. कारण काल मोदी यांची स्वदेशी गाडीतून झालेली एन्ट्री अनेकांना भावली.
ही गाडी स्वदेशी आहे, हे ऐकून अनेकांचे डोके चक्रावले असेल. होय, हे खरेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Range Rover Sentinel ही गाडी आणि Range Rover कंपनी टाटा मोटर्सच्या मालकीची आहे. ही गाडी केवळ ५.३ सेकंदात १०० किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडू शकते. तसेच यात २१८ किलोमीटर प्रति तास इतकी टॉप स्पीड आहे.
असे आहेत जबरदस्त फीचर्स :-
- ही एक आर्मर्ड गाडी असून तिच्यावर गोळ्या घातल्या आणि बॉम्ब फेकला तर काही फरक पडत नाही.
- या गाडीत आयईडी ब्लास्ट केला तरी या कारला काहीच होऊ शकत नाही.
- या कारचे टायर डॅमेज झाल्यानंतर सुद्धा १०० किलोमीटर पर्यंत ही कार चालवता येऊ शकते.
- ही कार केमिकल आणि गॅस हल्ला सहन करू शकते. याशिवाय ही कार अडचणीवेळी पाणी, चिखल, दगडातून सहज धावू शकते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर