Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘तो’ दिवस आलाच; ‘पहिली शंभराची नोट त्यांच्या हातामध्ये द्या’याची तयारी ठेवा..!

जगभरात पेट्रोलियम पदार्थांचे भाव कमी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने करापोटी याचे भाव गगनाला भिडवून ठेवले आहेत. परिणामी आता एका लिटर पेट्रोलला तब्बल 100 रुपये मोजण्याची सोय भारतीयांना उपलब्ध झालेली आहे.

Advertisement

असा सुदिन कधी येणार, याचीच चर्चा देशात सुरू होती. कारण, मागील महिनाभारात मोदी सरकारने पेट्रोलच्या भावात तब्बल दहावेळा वाढ केली होती. त्याचीच परिणीती म्हणून आता राजस्थान राज्यात प्रीमियम पेट्रोल 101.80 रुपये झाले आहे.

Advertisement

राजस्थानच्या गंगानगरमध्ये सामान्य पेट्रोल 98.40 रुपये प्रति लीटर आणि प्रीमियम पेट्रोल 101.80 रुपये प्रति लीटर झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 92.86 आणि दिल्लीमध्ये 86.30 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये 10 वेळा वाढ झाली आहे. आज डीझेल आणि पेट्रोल दोन्हीमध्येही 25-25 पैशांनी वाढ झाली.

Advertisement

जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल 2.59 आणि डीझेल 2.61 रुपये/ लीटर महाग झाले. या महिन्यात दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये 2.59 रुपये आणि डीझेलमध्ये 2.61 रुपयांची वाढ झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply