Take a fresh look at your lifestyle.

पोर्न साईटस पाहणार्‍यांनो इकडे लक्ष द्या; ‘त्या’ वेबसाईटचा डेटा झाला लिक

दिल्ली :

Advertisement

टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गाने पुढे जात आहोत. आपले प्रश्न कमी व्हावेत, आपल्यासमोरील मोठ्या अडचणी सुटाव्यात, अशी भूमिका टेक्नॉलॉजीचा वापर करण्यामागची आहे. डिजिटल आणि टेक्नॉलॉजीच्या जगात वावरत असताना आपले प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रायव्हसीचा. असाच प्रायव्हसीचा बट्ट्याभोळ झाल्याची एक बातमी आताच आपल्यासमोर आली आहे.

Advertisement

ही बातमी वाचून अनेकांना धक्का बसेल कारण पोर्न सेक्टरमधील एका बड्या वेबसाईटचा डेटा लिक झाला आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या साईटवर येणार्‍या तब्बल २० लाख युजर्संचा डेटा लिक झाला आहे. लीक झालेल्या डेटात युजर्सचा ईमेला आयडी, अॅड्रेस, युजरनेम आणि पासवर्ड यासारख्या गोष्टी लीक झाल्या आहेत. तसेच ही माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे.

Advertisement

MyFreeCams असे या पॉर्न वेबसाईटचे नाव असून या डेटाचा वापर सायबर अटॅक किंवा त्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. MyFreeCams एक पॉप्युलर पॉर्न वेबसाइट असून याचे जवळपास ७० लाख (७ कोटी) मंथली विजिटर आहेत. प्रसिद्ध एडल्ट साइटमध्ये ही साइट २७ व्या स्थानावर आहे. 

Advertisement

१० हजार युजर्सच्या डेटाच्या बदल्यात १५०० डॉलर बिटकाइन म्हणून घेतले जात आहे. दावा करण्यात येत आहे की, १० हजार युजर्सचा डेटाला खरेदी करून कमीत कमी १० हजार डॉलर कमाई केली जाऊ शकते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply