Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : उद्याच्या बैठकीवर ठरणार निवडणुकीची दिशा; मुंबईतून फिरणार चक्रे

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी फ़क़्त 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. अशावेळी राधाकृष्ण विखे पाटील गटाला शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची ताकद आणखी वाढली आहे. त्यासाठीच्या निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (दि. 27 जानेवारी 2021) मुंबईत बैठक होत आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारच्या नगर दौऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत माहिती घेतली. त्यावेळीच पवार यांनी स्पष्ट केले की, क निवडणुकीबाबत २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी या बैठकीला यावे. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. तिथेच काय तो सगळा सोक्षमोक्ष लागेल.

Advertisement

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत संगमनेरला बैठक घेतली. त्याला भाजपचे काही नेते उपस्थित होते. त्यामुळे विखे गटाबरोबर भाजपचे नेमके कोण, असाच प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर पवार रविवारी नगर दौऱ्यावर असताना त्यांनी आमदार जगताप यांच्या निवासस्थानी सर्व माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, माजी आमदार पांडुरंग अभंग, उदय शेळके, घनश्याम शेलार, नगरध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते.

Advertisement

७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply