Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून शिक्षकांच्या बदलीचे भिजत घोंगडे; ‘त्यामुळे’ हजारो शिक्षकांचा जीव टांगणीला..!

ज्ञानदानाचे आणि समाज घडवण्याचे महत्वाच्या जबाबदारीचे काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या बदल्या आणि एकूण कामाबाबत राज्य सरकारचे दुर्लक्ष कायम आहे. सर्व शिक्षक संघटनांनी वेळोवेळी लक्ष वेधूनही त्यांचे सर्व प्रश्न सुटलेले नाहीत. त्यातच बदल्यांचा मुद्दा तर भिजत घोंगडे म्हणून पडून आहे.

Advertisement

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या संदर्भातील धोरण निश्चित नाही. याचे धोरण केलेल्या समितीने १५ मार्च २०२० रोजी सरकारला अहवाल सादर केला होता. त्यावरून आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदल्यांबाबत कार्यपद्धती जाहीर करण्यात येणार होती. मात्र, दहा महिने उलटूनही हे धोरण जाहीर न झाल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना पुन्हा ऑफलाइन बदल्यांच्या धोरणाची भीती वाट आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन की ऑफलाइन करायच्या याबाबत अभ्यास गटाचा अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. पाच सीईओंच्या अभ्यासगटाने त्यांचा अहवाल सरकारला सुपूर्द केला आहे. त्यामुळे बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल, याची शिक्षकांना उत्सुकता आहेच. त्यातच ते जाहीर नसल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.

Advertisement

कोरोना विषाणूच्या संकटामुळे सरकार हे धोरण वेळीच जाहीर करू शकले नव्हते. मात्र, त्याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागाने याचे धोरण जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहेत. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply