Take a fresh look at your lifestyle.

विखेंनी उघडले खाते; पवारांना काटशह देण्यासाठी भाजपतर्फे जोरदार मोर्चेबांधणी

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना एकाकी करण्याची खेळी महाविकास आघाडीने खेळली आहे. मात्र, त्यालाही पुरून उरत विखे गटाने राहता येथील एक जागा बिनविरोध करून घेण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता इतर ठिकाणी काय-काय खेळ्या होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महाविकास आघाडीच्या गटाला आव्हान देण्यासाठी विखे पिता-पुत्र सरसावले आहेत. अशावेळी त्यांनी त्यांच्या तालुक्यातील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांना बिनविरोध निवडून आणून विखेंनी आपले खाते उघडले आहे.

Advertisement

विखे पाटील यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही कुमक आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक फ़क़्त विखे-थोरात गटामध्ये न राहता थेट त्याला पवार-फडणवीस अशीच किनार आलेली आहे.

Advertisement

दरम्यान, म्हस्के यांच्यासह शेवगाव सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार चंद्रशेखर घुले हेही बिनविरोध निवडून येत आहेत. त्यामुळे 21 जागांपैकी दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यात एक जागा आघाडीकडे तर दुसरी जागा भाजपच्या विखे गटाकडे आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply