Take a fresh look at your lifestyle.

भारताचे चीनविरुद्ध मोठे पाऊल; ‘त्यावर’ घातली कायमची बंदी

दिल्ली :

Advertisement

भारत आणि चीनमधील वातावरण अजून निवळलेले नाही. अद्यापही दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात तणाव जाणवत आहे. अशातच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर भारताने चीनला मोठा झटका दिसला आहे.  भारत सरकारने आता 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

यापूर्वीही भारताने 2 वेळा चीनवर डिजिटल स्ट्राईक करत चीनला मोठा धक्का दिला होता. त्यानंतरच्या काळात चीनी कंपन्यांशी असलेले अनेक करार रद्द करण्यात आले. भारत ही चीनसाठी मोठी बाजारपेठ आहे. भारताने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. आणि आता अखेरीस भारताने शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉक, विचॅट, अलीबाबा तसेच यूसी ब्राउझर आणि बीगो लाइव्ह यासारख्या 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घातली आहे.

Advertisement

या 59 अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यापूर्वी सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यात नोटीशीत संबंधित अ‍ॅप्सना डेटा कलेक्शन, डेटा प्रोसेसिंग, डेटा सिक्यॉरिटी आणि प्रायव्हसीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातील (IT) अधिकाऱ्यांचे या कंपन्यांनी दिलेल्या उत्तरांवर समाधान झाले नाही. यानंतर या अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply