Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : दिल्लीत शेतकर्‍यांवर लाठी चार्ज; राजू शेटटींवरही झाला गुन्हा दाखल, ‘त्यांच्या’ बेअक्कलपणाची कीव

दिल्ली :

Advertisement

एका बाजूला शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून थंडीत शेती आणि मातीसाठी आंदोलन करत आहे तर दुसर्‍या बाजूला कठोर काळजाचे केंद्र सरकार लाल किल्ल्यावरून प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. आज देशातील ऐतिहासिक आंदोलक शेतकर्‍यांनी एक मोठी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. आजवर अगदी शांतीत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लागले असून आज या आंदोलनाला हिसक वळण लागले आहे. दरम्यान महाराष्ट्रात सांगली येथे माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही ट्रॅक्टर रॅली काढली. त्यावेळी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शेट्टी यांनी म्हटले आहे की, जाणीवपूर्वक दिल्लीतील आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. गुन्ह्याविषयी बोलताना ते म्हणाले की, मोठे गर्दीचे कार्यक्रम जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बंटी पाटील या लोकांनी घेतलेले होते. तिथे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नव्हते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? बाळासाहेब थोरात, बंटी पाटील यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? , असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Advertisement

केवळ सामान्य माणसांवर अशा प्रकारे पोलिस गुन्हा दाखल होत असेल तर त्यांच्या बेअक्कलपणाची कीव करावीशी वाटते. आणि यामुळेच कोंग्रेस रसातळाला गेली, असेही पुढे बोलताना ते म्हणाले.         

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply