Take a fresh look at your lifestyle.

प्रत्येकाची प्रेरणा असणार्‍या अमेरिकेच्या प्रथम महिला ‘जिल बिडेन; त्यांच्याविषयीच्या ‘या’ 6 गोष्टी वाचून तुम्हालाही मिळेल प्रेरणा

जो बिडेन यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. सध्या जगभरात त्यांच्याविषयी चर्चा चालू आहेत. मात्र आयुष्यभर त्यांना साथ दिलेल्या त्यांच्या पत्नी अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बिडेन यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अध्यक्ष होताच त्यांच्या पत्नीचे आभार मानले आणि त्यांच्याशिवाय मी येथे पोहोचू शकत नव्हतो, असेही सांगितले.

Advertisement

जिल बिडेन यांचे प्रचंड प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्व त्यांच्याशी संपर्कात येणार्‍यांवर प्रभावी ठरते. त्या प्रत्येकसाठीच प्रेरणादायी आहेत, असे म्हटले जाते. जाणून घेऊयात त्यांच्या काही खास गोष्टी :-

Advertisement
  1. शिकवणे हे त्यांचे प्रोफेशन आहे. शिकवणे त्या कधीच बंद करणार नाही. अगदी अमेरिकेच्या प्रथम महिला बनल्यानंतरही त्या शिकवत राहनार आहेत. त्या Northern Virginia Community College मध्ये इंग्रजी हा विषय शिकवतात. यापूर्वीही बिडेन उपराष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी शिकवणे सोडले नव्हते.
  2. जिल बिडेन यांच्याकडे शिक्षण आणि कला विषयातील इंग्रजी ऑनर्समधून दोन पदव्युत्तर पदवी आहेत. एवढेच नव्हे तर वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी डॉक्टरेटही केली आहे. 2007 मध्ये डेलावेर विद्यापीठातून शिक्षण विषयात त्यांनी डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली.
  3. डॉक्टर जिल बिडेन या लेखकादेखील आहेत. आतापर्यंत त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. Don’t Forget, God Bless Our Troops आणि Joey: The Story of Joe Biden ही त्यांची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
  4. 1990 मध्ये जिल बिडेन यांनी धावण्यास सुरवात केली होती. हळू हळू ही देखील त्यांची आवड बनली. त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. जिल यांनी 1998 मध्ये मरीन कॉर्प्स मॅरेथॉन देखील पूर्ण केली.
  5. लोकांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूक करण्यात जिल या पुढे आहेत. वास्तविक, त्याच्या 4 मैत्राणींना हा त्रास होत होता. तेव्हापासून त्यांनी महिलांना या गोष्टीची जाणीव करण्यास सुरवात केली. 1993 मध्ये जिल यांनी बिडेन ब्रेस्ट हेल्थ इनिशिएटिव्ह नावाची मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत, त्यांनी या रोगाबद्दल लाखो लोकांना जागरूक केले आहे.
  6. जिल बिडेन या कम्युनिटी कॉलेज एज्युकेशन सिस्टमच्या समर्थक आहेत. त्यांना या सिस्टिमचे महत्त्व समजले आहे आणि त्या यांचे महत्व इतरांनाही सांगतात. अगदी येत्या काही दिवसांत त्या गरीब मुलांसाठी मोफत करण्याचा प्रस्ताव घेऊन येणार आहे. या महाविद्यालये कर्जमुक्त संस्था बनविण्यावरही त्या काम करत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply