Take a fresh look at your lifestyle.

राणेंचा अभ्यास कच्चा; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर रोहित पवारांनी म्हटलेय असे

अहमदनगर :

Advertisement

भाजपचे नेते निलेश राणे आणि पवार कुटुंबीयांमधील ट्विटर युद्ध वेळोवेळी सुरू होत असते. आताही करार शेती आणि कृषी सुधारणा विधेयकावरून राणे यांनी नकली म्हटले होते. त्यावर राणेंच्या अभ्यासावर रोहित पवार यांनी सूचक भाष्य केले आहे.

Advertisement

निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत रोहित पवार यांना नकली म्हटले होते. मात्र या टट्विटरचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राणे यांच्यावर तोफ डागली आहे.

Advertisement

पवारांनी म्हटले आहे की, राणे यांनी घाईघाईने ट्विट केले असे मला वाटते. कारण मी ४ डिसेंबरला या कृषी कायद्याच्या बाबतीत काही गोष्टी लिहिल्या होत्या. करार शेती हा विषय योग्य पद्धतीने केला तर ती चांगली गोष्ट आहे. त्याला आपण विरोध करू शकत नाही. परंतु आताच्या कायद्यात काही जाचक अटी आहेत.

Advertisement

कायद्यामध्ये एक नियम असा आहे की समजा शेतकरी व एखाद्या कंपनीत करार झाला व त्या करारातून शेतकऱ्याला बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दोन्ही पार्टीची मान्यता असणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधताना हीच अट शेतकऱ्यांना जाचक ठरण्याची भीती पवारांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

अभ्यास करून विषय समजून घेण्याची गरज असते. माझ्याकडे अजिबात लपवाछपवी नसते. माझी एक पद्धत आहे. मी एखादा विषय हा अभ्यास करून मांडतो. माझी जशी पद्धत आहे, तशी त्यांची एखादी पद्धत असेल. त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण त्यांनी लिहित असताना त्याचा अभ्यास करावा, असे म्हणत रोहित पवारांनी राणेंच्या अभ्यासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply