दिल्ली :
शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसक घडामोडीमुळे सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्ली जगभरात चर्चेत आहे. यानिमित्ताने फेक न्यूजला पुन्हा एकदा उधाण आलेले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारकडून अजूनही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी गृहमंत्री अमित शह यांनी याप्रकरणी तातडीची बैठक बोलावली आहे.
आंदोलनातील आजच्या घडामोडी अशा :
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मंगळवारी दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
मागच्या दोन महिन्यापासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले आहे.
दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यान ज्या भागात हिंसाचार घडला तिथल्या काही भागात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.
दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यान नांगलोई भागात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.
दिल्ली-हरयाणा सिंघू सीमेवर एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोनीपतच्या मादीना गावातील हा शेतकरी आहे. ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आंदोलन स्थळी त्याचे निधन झाले.
दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपाचे पोलिसचं जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी केला आहे.
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलक आक्रमक झाले असून लाल किल्ल्यावर त्यांनी प्रवेश केला. तसेच किल्ल्यासमोर या आंदोलकांनी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकावला.
दिल्ली-हरियाणा सिघू बॉर्डरवर एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सोनपतमधील मदीना गावातील राजेश यांचा मृत्यू झाला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला असून ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट