मोदीसत्ता व संघतंत्र होण्याकडे देशाची वाटचाल; पहा कॉंग्रेसने नेमके काय म्हटलेय ते
मुंबई :
प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होण्याकडे देशाची वाटचाल सुरू असल्याची जहरी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये याकरिता लढणे हाच संकल्प ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योग्य आहे. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो हे म्हणताना तो चिरायू राहावा ही जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तसेच एका व्हिडिओ मध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने ९९ नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली त्यामध्ये केवळ पद्मभूषण साठी सिंधुताई सपकाळ यांचे दिलेले नाव मोदी सरकारने लक्षात घेतले. त्यातही सिंधुताईंना पद्मश्री देण्यात आली. यामध्ये भाजपाशी व संघाशी जवळीक हाही निकष होता. युपीएलचे अध्यक्ष त्याच प्रकारे आले असे दिसते.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट