दिल्ली :
राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील शेतकरी आंदोलक आणि पोलिसांच्या हिंसक घडामोडी सुरू झाल्याने अवघ्या देशाला धक्का बसला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या अनेकांनी शेतकरी आंदोलनात दहशतनाद्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला आहे. तर, शेतकरी नेते राजेश टिकैत यांनी यात काही राजकीय व्यक्तींनी येऊन अशा घटना घडवल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनातील सर्व शेतकरी शांततेत आंदोलन करीत आहेत. गोंधळ पसरविण्याचा प्रयत्न करणारे चिन्हांकित व्यक्ती आहेत. ते राजकीय पक्षाचे लोक आहेत आणि ही चळवळ बिघडू इच्छित आहेत.
एकूणच यामुळे नेमका कोणता राजकीय पक्ष हे सगळे कुभांड रचित आहे हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव