Take a fresh look at your lifestyle.

दिल्ली धुमश्चक्रीबाबत संजय राउतांनी म्हटले ‘हे’; मोदी सरकारला केले लक्ष्य

मुंबई :

Advertisement

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अखेर हिंसक वळण लागले आहे. शेतकरी आंदोलकांनी सर्व नियम आणि अटी यासह लाल किल्ला परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल नापसंती दर्शवतानाच या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण असाही प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी केला आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, जर सरकारची इच्छा असती तर आजचा हिंसाचार थांबवता आला असता. दिल्लीत काय चालले आहे? कोणीही त्याला पाठिंबा देऊ शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंगा झेंड्याचा अपमान कोणालाही सहन होणार नाही. पण वातावरण का बिघडले? सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? कोणी न पाहिलेले हे राजकारण करीत आहे? जय हिंद.

Advertisement

Sanjay Raut on Twitter: “अगर सरकार चाहती तो आजकी हिंसा रोक सकती थी. दिल्लीमे जो चल रहा है ऊसका समर्थन कोई नही कर सकता. कोई भी हो लाल किल्ला और तिरंगेका अपमान सहेन नही करेंगे. लेकीन माहोल क्युं बिगड गया?सरकार किसान विरोधी कानून रद्द क्युं नही कर रही?क्या कोई अदृश्य हात राजनीति कर रहा है? जय हिंद” / Twitter

Advertisement

एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकरी कायदे देशहिताचे असल्याचे सांगतानाच आंदोलकांना दहशतवादाचा जोड देऊन टाकली होती. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. त्यातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने याला आणखी वेगळे आणि हिंसक वळण मिळाले आहे. त्यावर नेमके बेत ठेऊन राउत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकराला लक्ष्य केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply