दिल्ली :
शांत असलेली राष्ट्रीय राजधानी दिल्ली आज पेटली आहे. दुर्दैवाने प्रजासत्ताक दिन या महत्वाच्या राष्ट्रीय सणाच्यावेळीच ही घटना घडली आहे. त्यामध्ये आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडाली आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांवर तलवारी उगराल्याचे फोटो आणि व्हिडिओ येत आहेत.
त्याबद्दल लोकसत्ता न्यूजपेपर यांनी लिहिले आहे की, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर तलवारी उगारल्याची घटना घडली आहे. दिल्ली शहरात घुसणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच काही ठिकाणी लाठीचार्ज केला. त्यानंतर काही आंदोलकांची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या आहेत.
मागील दोन महिने होत आले तरीही शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. कृषी सुधारणा विधेयाकामधील जाचक आणि कॉर्पोरेट धार्जिण्या अटी आणि नियम शेतकऱ्यांना नको आहेत. अशावेळी त्यांनी याला विरोध करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. मात्र, सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी या आंदोलकांना काँग्रेस पक्षाचे असल्याचे किंवा दहशतवादी व नक्षलवादी म्हटले आहे.
परिणामी मागील अनेक दिवसांपासून आंदोलक संतप्त आहेत. त्यात आंदोलकांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास लवकर परवानगी मिळाली नाही. त्यानेही अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. अखेर त्यातून दिल्लीत पोलीस व आंदोलक यांच्यात हिंसक हल्ले सुरू झालेले आहेत. त्यामुळे देशभरातून दोन्ही बाजूने संताप व्यक्त होत आहे.
अक्षरधाम मंदिराजवळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने बॅरिकेडस मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. गाझीपूर सीमेजवळ शाहदरा येथे ट्रॅक्टरनी बॅरिकेडस मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दिल्ली-नोएडा बॉर्डरवर स्टंट करत असताना एक ट्रॅक्टर पलटी झाला.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!